अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी संकष्टी चतुर्थी मंडळाचा पुढाकार

Foto
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २१ हजारांचा धनादेश सुपूर्द
कन्नड, (प्रतिनिधी) :
तालुक्यातील शेतकरी बांधवांना पावसाळ्यातील अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असताना, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी संकष्टी चतुर्थी मंडळ कन्नड यांनी पुढाकार घेत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २१ हजार (एकवीस हजार) इतका मदतनिधी प्रदान करण्यात आला. सदर मदतनिधीचा धनादेश कन्नडचे तहसीलदार विद्याचरण
तहसिलदार
कडवकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी मंडळाचे प्रतिनिधी सदस्य कालीदास उपासनी, दिलीप जैस्वाल व सतीश अहेर उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे बाधित
शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारा हा उपक्रम समाजासाठी नवी प्रेरणा देणारा असून, संकष्टी चतुर्थी मंडळाचा हा परोपकारी उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.